तुझ्यात जीव रंगला फेम अवघ्या महाराष्ट्रााची लाडकी जोडी पाठकबाई आणि राणादा हे ख-या आयुष्यात नुकतेच २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीच्या मेहंदी, हळद, संगीत ते लग्न आणि वरातीपर्यंतच्या प्रत्येक अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता होती. दोघांनीसुध्दा ह्या लग्नाचे सगळे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत त्यांची मनं जिंकली. आता लग्नाला काही दिवस उलटूनसुध्दा या जोडीची क्रेझ कमी होत नाहीय.
लग्नानंतर हार्दिक व अक्षया कॉफी डेटसाठी गेले होते. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच कॉफी डेट होती. त्यानंतर हार्दिक अक्षयाला घेऊन रोड ट्रिपसाठी गेला.
आता हे नवविवाहित जोडपं नाशिकला पोहोचलं आहे. लग्नानंतर हार्दिक व अक्षया देवदर्शन करत आहेत. नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचं दोघांनी दर्शन घेतलं आहे. यादरम्यानचे फोटो अक्षया व हार्दिकने तिच्या सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत.
चाहते या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.