रितेश देशमुखच्या दिग्दर्शनातला पहिला मराठी सिनेमा आणि जिनिलियाच्या मराठी पदार्पणातलापहिला सिनेमा वेड ची सर्वत्र बरीच उत्सुकता आहे. बॉलिवूड सोबतच मराठी प्रेक्षकांनासुध्दा आपलीशी वाटणारी ही जोडी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होण्याची चाहते खुप वाट पाहतायत. दरम्यान वेड या आगामी सिनेमाचं प्रमोशन सध्या दणक्यात सुरु आहे.
रितेश- जिनिलीयाच्या वेड चित्रपटाच्या नुकताच टिझर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने उत्सकता आणखी वाढवलीय . स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत जिनिलीया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच गेली होती. रछोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. यातला जिनिलियाचा खास अपिअरन्स पाहण्यासाठी ाता प्रेक्षक वाट पाहतायत.
'रंग माझा वेगळा' मालिकेच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.