अभिनेता उमेश कामत आणिअभिनेत्री प्रिया बापट ही सेलिब्रिटी जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. त्यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री खुप गोड दिसते. सोशल मिडीयावरही ही जोडी लोकप्रिय आहे. उमेश आणि प्रिया नेहमीच एकमेकांसोबतचे भन्नाट व्हिडीओ, फोटो आणि रील्स शेयर करत असतात.चाहतेही त्याला भरभरु प्रतिसाद देतात.
आज अभिनेता उमेश कामतचा वाढदिवस आहे. मराठी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करणारा हॅण्डसम अभिनेता अशी उमेशची ओळख आहे. उमेशच्या वाढदिवसानिमित्त पत्नी प्रिया बापटने दोघांचा एक खास व्हिडीओ शेयर करत आपल्या लाईफ पार्टनरला शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये तिनं तिच्या आणि उमेशच्या बऱ्याच आठवणींना एकत्र करुन त्याचा स्पेशल व्हिडीओ बनवला आहे. प्रियाने पोस्ट शेअर करत लिहिलं, 'हॅपी बर्थडे माय लाईफ'. उमेशचा आणि प्रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उमेशवर त्याच्या खास दिवशी खूप सारं प्रेम, शुभेच्छा, आशिर्वादचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, उमेश कामतने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. तो सध्या 'फू बाई फू' मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे.