By  
on  

Video : रितेश-जिनिलियाच्या मराठी सिनेमाचा हा 'वेड' लावणारा ट्रेलर पाहिलात का?

रितेश देशमुखच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा आणि जिनिलिया देशमुखच्या मराठी सिनेमात पदार्पणातला सिनेमा वेडचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला. नावाप्रमाणेच या सिनेमाच्या ट्रेलरे प्रेक्षकांना वेड लावलंय.या ट्रेलरमुळेच सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचलीय. महत्त्वाचं म्हणजे यात रितेश-जिनिलियाची लव्ह स्टोरी नाही तर प्रेमासाठी चाललेली त्यांची तडफड, जवळ असूनही सोसावा लागणारा विरह अनुभवायला मिळणार आहे. 

चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत. सिध्दार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांच्याही ह्यात लक्षवेधी भूमिका आहेत

वेड सिनेमातली गाणीसुध्दा  रसिकांना वेड लावत आहेत.  ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive