मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक व पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीच आलबेल नाही. त्यांचा आता लवकरच घटस्फोट होणार आहे . मागच्या वर्षीच मानसी लग्नबंधनात अडकली होती. पती परदीप खरेरा यांच्यासोबतचे अनेक रोमॅण्टिक व्हिडीओ आणि फोटोसुध्दा ती सतत चाहत्यांसोबत शेयर करायची. पण गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ-फोटो शेयर करणं सोडाच उलट तिने आपल्या लग्नाचे आणि इतर पतीसोबतचे सगळे फोटो-व्हिडीओ काढून टाकले आाहेत.
त्यातच ती सोशल मीडियावर विविध पोस्ट करताना दिसत आहे. त्यातच आता मानसी नाईकने पुन्हा एक पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मानसी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
मानसी पोस्टमध्ये म्हणतेय, जानेवारी तुम्हाला स्वप्नं दाखवते आणि डिसेंबर तुम्हाला आरसा.
पतीपासून विभक्त झाल्यानंतर अनेकदा मानसी अशाप्रकारच्या विविध पोस्ट करताना पाहायला मिळते.