रितेश देशमुखच्या वेड सिनेमाची सध्या सर्वत्र बरीच चर्चा आहे. नकतंच या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांसमोर आला. त्यालाही प्रचंड प्रतिसाह मिळाला. अजय-अतुल यांचं दमदरा संगीत असलेली गाणीही प्रेक्षकांना खुप भावतायत. दरम्यान रितेश देशमुखचा आज17 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे आणि याचनिमित्ताने बॉलिवूडचा भाई सलमान खानने त्याला खास सरप्राईज दिलं आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित पहिला मराठी सिनेमा वेडमध्ये सलमान खानचा कॅमिओ आहे. त्याच्यावर चित्रित झालेल्या गाण्याचा टीजर नुकताच सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन शेयर केला आहे.
सलमान खान रितेश देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतो, भाऊचा बर्थडे आहे. गिफ्ट तो बनता आहे.
वेड लावलंया हे या सिनेमातलं टायटल सॉंग असून त्याचा हा टीझर आहे. रितेश देशमुख आणि सलमान खानवर हे गाणं चित्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.
चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत. सिध्दार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांच्याही ह्यात लक्षवेधी भूमिका आहेत.
वेड सिनेमातली गाणीसुध्दा रसिकांना वेड लावत आहेत. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.