महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर या आठवड्यात रणवीर सिंह, रोहित शेट्टी, पूजा हेगडे आणि सिध्दार्थ जाधव अशी सगळी सर्कसची टीम आली होती.त्यांनी आमि हास्यजत्रेतील कलाकारांनी एकच कल्ला या भागांमध्ये केला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार यांनी यादरम्यान रोहित शेट्टीबरोबर एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. या फोटोमध्ये अरुण कदम यांनी डोळे मिटलेले दिसत आहेत. तसेच त्यांनी या फोटोला एक हटके कॅप्शन दिलं आहे.रोहित शेट्टीबरोबरचा फोटो शेअर करताना अरुण कदम यांनी म्हटलं की, “हा फोटो चुकलेला नसून रोहित सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा धन्य झालो म्हणून डोळे बंद झाले आहेत.” पण या कॅप्शनवरुनच अरुण यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पैसा आणि प्रसिद्धीत धन्यता मानली तर तुम्ही स्वतःला कलाकार म्हणवून घेऊ नका. त्याच्यापेक्षी तुम्ही श्रेष्ठ आहात, मराठी कलाकार स्वतःला कमी का समजतात, कोणाला किती महत्त्व द्यायचं हे नीट ठरवा, आम्ही तुमची थोरवी गायची आणि तुम्ही हिंदी कलाकाराने हात ठेवला की धन्यता मानायची