By  
on  

सुप्रसिध्द अभिनेते देवदत्त नागे यांचा डोळा थोडक्यात बचावला!

तान्हाजी द अनसंग वॉरियर आणि आदिपुरुष या बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे जय मल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे यांना नुकताच अपघात झाला आहे. जीव माझा गुंतला या कलर्स मराठीवरील मालिकेत नुकतीच देवदत्त यांची एन्ट्री झाली होती. मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर त्यांना दुखापत झाली आणि त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. या अपघाताची माहिती खुद्द देवदत्त यांनीच आपल्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना दिली आहे. सोबत चेह-याचा फोटोही पोस्ट केला आहे. 

देवदत्त यांना झालेला हा अपघात किरकोळ असला तरी काही काळ त्यांना जीव माझा गुंतला मालिकेच्या शूटींगमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे. 

देवदत्त फोटो शेअर करत म्हणाला, “आता काही दिवसांसाठी आराम. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान छोटी दुखापत झाली. देवाचे आभार की थोडक्यात डोळा वाचला.” देवदत्तच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जखम दिसत आहे. चाहते ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive