'ठिपक्यांची रांगोळी' फेम शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरेला रिअल लाईफ अप्पू मिळालीय. नुकताच चेतनचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला.
अभिनेता चेतन वडनेरेनं अभिनेत्री ऋतुजा धारपबरोबर साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आलेत. चेतन आणि ऋतुजा मागच्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चेतन सध्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. त्याआधी त्यानं फुलपाखरू, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यात.तर ऋतुजानं आई माझी काळुबाई, वर्तुळ, क्राईम पॅशन, फुलपाखरू सारख्या मालिकेत काम केलं आहे.
फुलपाखरू मालिकेत चेतन आणि ऋतुजा यांची ओळख झाली. दोघांचं प्रेम जमलं आणि 4 वर्षांनी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.