By  
on  

गौप्यस्फोट! पुण्याच्या नगरसेवकाने तेजस्विनी पंडितला दिली होती 'ती' ऑफर

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्यांच्या जोरावर स्थान मिळवणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एका वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहे. तिने नुकताच एक खळबळजनक खुलासा एका मुलाखतीत केला आहे. स्ट्रगलिंगच्या काळात नाव कमवण्यासाठी धडपडत असताना पुण्यातील एका नगरसेवकाने आपल्याकडे घाणेरडी मागणी केली होती, असा दावा तेजस्विनीने केला आहे. नुकतंच एका पॉडकास्टवर मुलाखत देत असताना तेजस्विनीने नगरसेवकाचे नाव घेण्याचं टाळत त्याने केलेल्या निर्लज्ज ऑफरविषयी सांगितलं.

तेजस्विनी म्हणाली कि, ''२००९-२०१० च्या आसपासची गोष्ट आहे. आम्ही पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचो. त्यावेळी माझे एक-दोनच सिनेमे रिलीज झाले होते. अपार्टमेंट एका नगरसेवकाच्या मालकीचे होते.''

ती पुढे म्हणाली, ''मी भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने मला थेट ऑफर दिली,'' असा धक्कादायक खुलासा तेजस्विनीने केला आहे.

पण तिने सुद्धा ऐकून न घेता त्या नगरसेवकाला जशास तसे सडेतोड उत्तर दिले होते. ती म्हणाली, ''टेबलावर पाण्याचा ग्लास होता, मी तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला.''

''मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या,'' असं नगरसेवकाला खडसावल्याचं तेजस्विनी म्हणाली.

तेजस्विनीच्या मते, तिच्यासाठी ती वेळ आणि अनुभव शिकण्यासाठी होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive