सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले २३ नोव्हेंबर रोजी काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते.. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी श्रध्दांजली सभेचं इस्कॉन, जुहू येथे आयोजन करण्यात आलं होतं.
जॉनी लिव्हर, शबाना आझमी, स्मिता जयकर आदी कलाकार मंडळी विक्रम गोखलेंना श्रध्दांजली वाहण्यासाठी खास उपस्थित होती.
मराठी सिनेसृष्टीने एक दमदार कलाकार गमावल्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळलीय.
ब्लॅक आणि व्हाईट पासून रुपेरी पडदा गाजवणा-या विक्रम गोखले यांची आजपर्यंतच्या गोदावरीपर्यंतची कारकिर्द लक्षवेधी ठरली. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपलं खास स्थान निर्माण केलं. वऱ्हाडी आणि वाजंत्री हा 1973मध्ये आलेला सिनेमा विक्रम गोखलेंच्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा ठरला. प्रेम विवाहावर आधारित या सिनेमात विक्रम गोखले यांनी प्रोफेसर गोविंदराव ही भूमिका साकारली होती. माहेरची साडी, कळत नकळत, वझीर, बाळा गाऊ कशी अंगाई, दरोडेखोर, नटसम्राट, निळकंठ मास्तर या सिनेमांत त्यांनी दमदार भूमिका साकारल्या,
विक्रम गोखले यांचा 'लागलं का पाणी मारूतीच्या पायाला' हा एकच डायलॉग संपूर्ण सिनेमात चटका लावून गेला. स्मृर्तीभंश झालेल्या नारुशंकर आजोबांची भूमिका विक्रम गोखलेंनी अजरामर कली.