मराठी मालिका आणि सिनेविश्वात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्थान कमावणारा हॅण्डसम हंक अभिनेता सुव्रत जोशीच्या एका पोस्टने चाहते नाराज झाले आहेत. हजरजबाबीपणा सुव्रत प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण आता मात्र त्याच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो, परंतु त्याच्या या पोस्टने सगळेच नाराज झाले.
“आता पूर्णविराम देण्याची वेळ झाली,” असं लिहिलं आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की तो नक्की कशाच्या संदर्भात बोलतोय. पण त्याची ही पोस्ट आहे त्याचं नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ विषयी. अनेक वर्ष रंगभूमीवर लोकप्रिय ठरणा-या या नाटकाचे आता अखेरचेच काही प्रयोग शिल्लक आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतील कलाकारच या नाटकात दमदार अभिनय करत होेते. 2016 साली या नाटकाचा शुभारंभ झाला होता.
सुव्रत जोशी आपल्या पोस्टमध्ये लिहतो,
२०१६ साली नव्या दमाच्या काही कलाकारांसोबत, प्रवासाला सुरुवात केली. *अमर फोटो स्टुडिओ* हे त्या प्रवासाचं नांव! मोठ मोठ्या कलाकारांच्या जोरात चाललेल्या नाटकांच्या पंगतीत आपल्या ह्या नवीन मेन्यूला कशी दाद मिळेल ह्याची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होती.
मनस्विनी लता रविंद्र लिखित, निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक १३ ॲागस्ट २०१६ साली रंगमंचावर आलं! अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे ह्या पाच दमदार कलाकारांनी उत्कृष्ट पद्धतीने ते नाटक सादर करून सर्व वयोगटातील नाटक वेड्या प्रेक्षकांची मनं जिकली, आणि महाराष्ट्रासहीत देश-विदेशात अत्यंत यशस्वी प्रयोग केले. सखी आणि सिद्धेश वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने थोडे विसावले, पण पर्ण पेठे आणि साईनाथ गणूवादने नाटकाच्या यशाची घोडदौड चालूच ठेवली.
पण…..
आता वेळ आलीए पूर्ण विराम देण्याची.
ज्या प्रेक्षकांनी उदंड प्रेम देऊन आम्हाला आनंद दिला, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी, जानेवारी २०२३ मधे ह्या नाटकाचे मोजके प्रयोग करीत आहोत.
तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येऊ तेव्हा नक्की भेटू. #प्रेम #अमरफोटोस्टुडिओ