महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची एक खासियत आहे. धम्माल स्किट्समुळे प्रत्येकाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. हास्यजत्रेतले कलाकार घरोघरी लोकप्रिय आहेत. यापैकीच दत्तू मोरे. प्रत्येक स्किट्समध्ये दत्तू त्याच्या स्टाईलने कॉमेडीचा तडका लावतो. मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण दत्तूला तंतोतंत उपयोगी येते. नुकतंच दत्तूच्या चाळीला दत्तूची चाळ हे नाव दिल्यानंतर आता त्यांचा आणखकी एक बहुमान झाला आहे. तो म्हणजे दत्तू आता हिंदी जाहिरातीत झळकतोय. दत्तूला एक हिंदी जाहिरात मिळाली आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दत्तूने ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे.
दत्तूने हिंदी जाहिरातीतील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या जाहिरातीत त्याने कैद्याची भूमिका साकारली आहे. तुरुंगातील कैद्यांच्या गणवेशात तो फोटोमध्ये दिसत आहे. “माझी पहिली हिंदी जाहिरात. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे”, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. दत्तूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.