By  
on  

पाहा Video : काजोल आणि तनिषाने आईसाठी केलं असं काही...........

बॉलिवूड व मराठी सिनेसष्टी गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तिन्ही पिढ्या अभिनय क्षेत्रात आहेत. तनुजा यांच्या मुली काजोल व तनिषा या बॉलिवूडमध्या इतर बहिणींच्या जोड्यांप्रमाणेच सतत एकत्र असतात. त्याच्यांत छान बॉंड आहे. नेहमीच तो दिसून आला आहे.  तनुजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचा हा वारसा आता काजोल आणि तनिषा जपत आहेत. तनिषाला काजोल इतकं यश मिळालं नसलं तरी ती चाहत्यांमध्ये चर्चेत असते. या मायलेकींची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. आता काजोलने आपली बहीण तनिषासोबत मिळून आईला खूप मोठी भेट दिली आहे. त्यांनी आईसाठी लोणावळा येथे एक आलिशान बांगला खरेदी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तिच्यासाठी ते गृहप्रवेशापर्यंत सरप्राईज ठेवलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल आणि तनिषा यांनी त्यांची आई तनुजा यांच्यासाठी लोणावळ्यात नवीन घर खरेदी केलं आहे. त्यांची ही खास भेट पाहून तनुजाही आश्चर्यचकित झाल्या आहेत. हा बंगला बांधण्यासाठी सुमारे आठ महिने लागले. घराची लाल फित कापताना या तिघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

 

 

तनिषाने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, 'आणि आम्ही आईसाठी लोणावळ्यात घर घेतलं. तिला आठ महिने या घरापासून दूर ठेवलं.' त्यांनी घेतलेलं हे घर प्रशस्त आणि आलिशान दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive