मराठी कलाविश्वाल यंदा आणखी एक धक्का बसला आहे. मराठी रंगभूमी, सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ आदी मराठी, तर ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी आणि इंग्रजी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मालिका आणि नाटकांमध्येही कामे केली होती. ‘ढाई आखड प्रेम के’, ‘चुप कोर्ट चालू है’ ही हिंदी नाटके तर ‘वख्त की रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ या हिंदी मालिकांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या.
'दामिनी' , 'वादळवाट' , 'या सुखांनो या', 'झुंज', 'समांतर', 'बंदिनी', 'वहिनीसाहेब', 'या गोजिरवाण्या घरात', 'मनस्विनी', 'अग्निहोत्र', 'श्रावणबाळ रॉकस्टार' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' अशा अनेक मालिकांमध्ये राजा बापट यांनी काम केलं आहे.