By  
on  

तुनिषाच्या आत्महत्येनंतर मानसीची 'ती' पोस्ट ठरतेय लक्षवेधी

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती विविध पोस्टमधून सर्वांचं नेहमीच लक्ष वेधून घेते. मानसी आणि तिचा पती परदीप खरेरा यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. मानसीनेच तिच्या नात्यात आलेला दुरावा सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला होता. आता पुन्हा एका पोस्टने ती चर्चेत आहे. 

दोन दिवसांपूर्वीच हिंदी मालिकाविश्वातील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपल्या मालिकेच्या सेटवरतीच मेकअप रुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मालिकेचा नायक व तिचा बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेमभंग आणि नात्यातील कटुता यामुळे तुनिषाने हे टोकाचं पाऊलं  उचलल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा असून मानसीने तिच्या या घटनेचासंदर्भ स्वत:शी जोडत ही पोस्ट केली आहे. 

 

आत्महत्येच्या 15 दिवस आधी तुनिषाचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपच्या मानसिक ताणातून तुनिषानं आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तुनिषाप्रमाणेच मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकनं नुकतीच नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. मात्र ती तिच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देत असून कामावर फेकस करत आहे.

मानसीनं म्हटलंय, 'मी अशा जगात आहे जिथे हार मानणं खूप सोपं आहे'.

माझ्या आईने 9 महिने मला पोटात वाढवलंय. हे हदय बनविण्यासाठी तब्बल ९ महिन्यांचा काळ गेलाय तो मी तोडणार नाही.

'पण मी माझ्या आई वडिलांना वचन दिलं आहे की मी कधीच गिवअप करणार नाही'.

'माझ्या इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नका. प्रत्येकाचा ब्रेकींग पॉइंट येतो. माझाही आला होता'.

मानसीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

 

 

'मी कोणतीही समस्या नाही त्यामुळे मी ग्रो होत राहिनं आणि सदैव चमकत राहीन. मी माझ्या आई बाबांची लाडकी राजकन्या आहे'.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive