मराठीच्या छोट्या पडद्यापासून बराच काळ दूर असलेली गोड व सोज्वळ अभिनेत्री मृणाल दुसानिस ही नुकतीच आई झाली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मृणालनेच ही आनंदवार्ता चाहत्यांशी शेयर केली होती. मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुरवी असं तिच्या लेकीचं नाव आहे. मृणाल आणि तिचे पती नीरज मोरे हे परदेशात वास्तव्यास आहेत. दोघंही नवीन पालक आपल्या चिमुकलीचं बालसंगोपन करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळतंय.
मृणालने नुकताच लेकीसोबतचा एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या गोड फोटोवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. पण मृणालने या सेल्फी फोटोला दिलेलं कॅप्शन खुप लक्षवेधी ठरतंय.
हा फोटो शेअर करताना मृणालने लिहिलं, “कसे आहात सगळे? खूप कष्टांनी मी हा फोटो काढला आहे. आमचा दोघींचा असा पहिलाच फोटो. त्यामुळे खूप खास आहे माझ्यासाठी.” या कॅप्शनबरोबर तिने #motherdaughtertime हा हॅशटॅगही वापरला आहे.
मृणाल दुसानीसने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.