मालिकाविश्वात शशांक केतकर हा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी'च्या यशानंतर आता पडद्यावर दुसऱ्या स्कॅमची पूर्ण कथा येणार आहे. काही महिन्यांपूर्वी अप्लॉज एंटरटेन्मेंटनं 'स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी'ची घोषणा केली होती. स्कॅम १९९२ ला भरपूर यश मिळालं होतं. थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार ही भूमिका करत आहे. अभिनेता शशांक केतकरही या सीरिजचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. एक खास पोस्ट शेअर करत त्यानं हे चाहत्यांसोबत शेअर केलं. त्याच्या या पोस्टवर सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. त्याच्या चाहत्यांनी तसंच इतर सेलिब्रिटींनी शशांकचं अभिनंदन केलं आहे.