By  
on  

नव्या वर्षात अप्सरेने दिली 'ही' आनंदाची बातमी, होतोय शुभेच्छांचा वर्षाव!

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमधून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची आणि आयुष्यातील विविध घडामोडींची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. नवीन वर्षात सोनालीने तिच्या चाहत्यांना एक जबरदस्त गुड न्यूज दिली आहे. ती ऐकून तुम्हीसुध्दा म्हणाल, क्या बात है!

आजवर अनेक विवध कलाकृतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकणा-या सोनाली कुलकर्णीने आणखी एक यशाचं शिखर गाठलं आहे. सोनाली आता मल्याळम सिनेमात झळकणार आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सोनाली म्हणतेय कि, 'नवीन वर्ष... नवीन प्रवास...नवीन प्रदेश... @lijo_lebowski च्या #malayalam चित्रपट #malaikottaivaaliban मध्ये दिग्गज @mohanlal सर सोबत काम करताना माझे नवीन वर्ष खरोखरच आशादायक वाटत आहे.'

सोनालीच्या या पोस्टवर चाहते आणि कलाविश्वातील मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

दरम्यान नवीन वर्षात सस्पेन्स-थ्रीलर पठडीतला 'व्हिक्टोरिया' आणि ऐतिहासिक मोगलमर्दिनी 'महाराणी ताराराणी' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive