'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. यात अभिच्या पत्नीच्या भूमिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा सुध्दा मोठा चाहता वर्ग आहे. यापूर्वी ती स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत राणूअक्का म्हणून घराघरांत पोहचली. आता 'आई कुठे काय करते'मुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनलीय. अश्विनी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्ट ती शेयर करते. पण नुकतंच एक खास पोस्ट शेयर करत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अश्विनी महांगडे हिने नुकतीच गाडी घेतली आहे. त्यानंतर आता ती पुन्हा नवीन सुरुवात करत आहे.
नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अश्विनीने महत्वाची घोषणा केली आहे.
अश्विनीने 'फ्लाईंग एंजल' नावाची नवी संस्था सुरु केली आहे. याविषयी सांगताना ती म्हणाली कि, 'तुमच्या अंगची कला तुम्हाला पैसे तर कमवून देईल पणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे #नाव आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी आमची.'
'अशा महिला, मुली ज्यांना काहीतरी करायचे आहे पणं नेमके काय करू याचे मार्गदर्शन मिळत नाही तर या माध्यमातून आम्ही उत्तम मार्गदर्शक तुमच्यासाठी आणत आहोत जे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मार्ग मोकळा करून देतील.' असं अश्विनीने सांगितलय.
ती पुढे म्हणतेय कि, 'आपल्यातील कलेला जगवा. प्रत्येक पुरूषाने घरातील स्त्री ला तिच्यातील गुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक पुरूषाने तिच्या पाठीशी उभे रहायला हवे. तुमची बहीण म्हणून मी अश्विनी महांगडे आणि भाऊ म्हणून निलेश बाबा जगदाळे कायम उभे आहोत.'