By  
on  

‘तू तेव्हा तशी’ फेम नीलचा झाला साखरपुडा, पाहा Photos

मनोरंजनविश्वात गेले काही दिवस लगीनघाई पाहायला मिळतेय. नवीन वर्षातसुध्दा हे लग्नाचे वारे थांबताना दिसत नाहीयत. आता आणखी एक अभिनेता एन्गेज झाला आहे. तू तेव्हा तशी ह्या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेत नील ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता स्वानंद केतकरचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. स्वानंदने 4 जानेवारी रोजी अक्षता आपटेसोबत साखरपुडा केला. 

साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत नील फेम स्वानंदने सोशल मिडीयावरुन ही बातमी चाहत्यांना दिली. 

त्याच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तू तेव्हा तशी मालिकेत सौरभ-अनामिका सोबतच नील-राधा ही लव्हस्टोरीसुध्दा फुलतेय.साध्या-भोळ्या नीलच्या व्यक्तिरेखेतून स्वानंद प्रेक्षकांची मनं जिंकतोय,सहाय्यक भूमिका असली तरी तो घराघरांत पोहचलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshata Apte (@akshataapte)

‘तू तेव्हा तशी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अभिनेता स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive