By  
on  

Video : महेश बाबूंची लेक मराठीत संक्रांतीच्या शुभेच्छा देते तेव्हा...

देशभरात मकरसक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच हा सण उत्साहात साजरा केला. तिळगूळ खाऊन एकमेकांना गोड गोड शुभेच्छा देत पतंगबाजी करत सगळ्यांनी धम्माल केली. साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. अनेक पोस्ट करत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. ब-याचदा त्याच्या पोस्टमध्ये त्याची लेक सिताराचे व्हिडीओ असतात. आताही सिताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जो तिची आई म्हणजेच महेशबाबूची पत्नी- अभिनेत्री नम्रता शिरोडकरने शेअर केला आहे.

महेश बाबूची लेक सिताराने मराठीतून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रता शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सितारा, “मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.” असं बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिताराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नम्रताने लिहिलं, “मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

मराठी अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आता ती आपल्या कुटुंबासोबतच व्यस्त असल्याचे पाहायाला मिळते.  नम्रता शिरोडकर दाक्षिणात्य संस्कृतीबरोबर आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचाही खूप आदर करते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive