By  
on  

बिग बॉस मराठी फेम मेघा घाडगे म्हणते, "अहो पाव्हनं ...."

"अहो पाव्हनं ..." तुमच्यासाठी असे शब्द असलेल्या, नजाकतदार लावणीचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकनं आणला आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या नव्या, अस्सल लावणीचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. अभिनेता संजय खापरेही या म्युझिक व्हिडिओमध्ये आहेत.

सप्तसूर म्युझिकनं नेहमीच वैविध्यपूर्ण म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यात कोळीगीतांपासून लग्नगीतांपर्यंतच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यात आता "अहो पाव्हनं ..." या नव्या लावणीच्या म्युझिक व्हिडिओचा समावेश आहे. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर मेघा घाडगे आणि संजय खापरे या म्युझिक व्हिडिओत प्रमुख भूमिकेत आहेत. 

"अहो पाव्हनं ..." या गाण्याचं लेखन योगेश पाटील यांनी केलं आहे, तर प्रवीण डोणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे यांनी गायलं आहे. मेघा घाडगे यांनी या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केले असून नृत्यदिग्दर्शक म्हणून अविनाश पायाळ यांनी काम पाहिले आहे. सुरेश देशमाने यांनी छायाचित्रण केले असून जयेंद्र भांडे या गाण्याचे संगीत संयोजक आहेत.अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. 

 सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ पाहता येणार आहे. आजपर्यंत संगीतप्रेमींनी सप्तसूरच्या म्युझिक व्हिडिओजना भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे "अहो पाव्हनं ..." ही अस्सल लावणी रसिकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही.


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive