द कश्मिर फाईल्स या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या सिनेमामुळे अनेक वादांनासुध्दा तोंड फुटलं तर अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या व्यक्तिरेखेलासुध्दा जोरदार विरोध झाला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी-अग्निहोत्री महत्त्वूपूर्ण भूमिकेत आहे. अभिनेत्रीला एका कारने धडक दिली असून. चित्रपटाच्या सेटवरच ही घटना घडली आहे.
आयएएनएसने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर'च्या सेटवर एका कारचं नियंत्रण सुटलं आणि ती कार येऊन अभिनेत्री पल्लवी जोशीला धडकली.मात्र अभिनेत्रीने दुखापत असूनही, आपला शॉट पूर्ण केला आणि नंतर उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार पल्लवी जोशी ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच द व्हॅक्सीन वॉरच्या सेटरचे काही फोटो पल्लवी जोशी यांनी इन्स्टाग्रामवरुन शेयर केले होते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्र आणि शास्त्रज्ञांच्या समर्थन आणि समर्पणाला ट्रिब्यूट देणारा आहे. हा सिनेमा भारतीय शास्त्रज्ञ आणि लोकांवर आधारित आहे ज्यांनी कोरोनाविरूद्ध लस विकसित करण्यासाठी 2 वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस काम केल. द कश्मिर फाईल्स दिग्दर्शकाचा हा आगामी सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी द वॅक्सिन वॉर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.