अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री ह्रता दुर्गुळे हिने मालिकाविश्वात आपलं मोठं स्थान निर्माण केलं, छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका अशी तिची ओळख आहे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन उडू उडू झालं या झी मराठीवरील रोमॅण्टिक व कौटुंबिक मालिकेतूनतिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसंच रंगभूमीवर ह्रताची प्रमुख भूमिका असलेलं दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकही खुप गाजलं. रवी जाधव यांच्या अनन्या आणि टाईमपास ३ या सिनेमांमधूनही मोठ्या पडद्यावर ह्रताच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.
यंदा ही मोस्ट फेव्हरेट अभिनेत्री आपला फियान्से प्रतिक शहा सोबत लग्नबंधनात अडकली. हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतिक शहाला काही काळ डेट केल्यानंतर तिने त्याच्यासोबत शाही थाटात विवाह केला. या शाही विवाह सोहळ्याची खुप चर्चा रंगली होती. . ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. यानंतर तिने अमराठी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. आता यावर तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
अमराठी मुलाशी लग्न केल्यामुळे लग्नाच्या फोटोंवर ह्रताला ट्रोल करण्यात आले. परंतु ह्रताने त्यावेळी शांत बसणं पसंत केलं. पण आता तिने या ट्रोलर्सना मस्त खडे बोल सुावले आहेत.
नुकतंच एका मुलाखतीत ह्रताला या ट्रोलिंबाबत विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली “आपल्याला सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची फार गरज नसते. माझं आणि प्रतीकचं लग्न ठरल्यावर अनेकांनी मला त्याच्या अमराठी असण्यावरून प्रश्न विचारले. यावरुनल मला सोशल मीडियावर ट्रोलही केलं.
पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन उगीच वाद वाढवण्यापेक्षा अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं मला जास्त योग्य वाटलं. आपल्या निर्णयामुळे समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत बसलो तर आयुष्यात आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे याकडे मी दुर्लक्ष केलं”, असे ऋताने यावेळी म्हटले.