By  
on  

Video : फिल्टरपाड्याच्या बच्चनची दुबईत हवा, म्हणतो 'आम एम गौरव मोरे ..'

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यातच नाही तर देश-परदेशातही तितकाच गाजतोय. या कार्यक्रमातील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकतायत. त्यांचे प्रत्येक स्किट्स प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालेत. प्रत्येकाच्या टेन्शनवरची ते खरोखरच मात्रा ठरतायत. नुकतीच दुबईमध्ये हास्यजत्रेच्या कलाकारांची हास्याची मैफील रंगली. अफलातून विनोद शैलीने विनोदवीरांनी दुबईकरांनाही खळखळवून हसवलं. हास्यजत्रेतूनच फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेल्या गौरव मोरेलाही प्रसिद्धी मिळाली.

गौरवला दुबईतही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. दुबईच्या रंगमंचावरील एक व्हिडीओ गौरवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

 

या व्हिडीओत गौरव दुबईतील स्टेजवर प्रेक्षकांसमोर येतो तेव्हा सभागृहातत एकच जल्लोष होतो. टाळ्या-शिट्ट्यांनी प्रेक्षकसभागह दणाणून टाकतात. हा खुपच भारावून टाकणारा प्रसंग गौरवने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. तो लिहतो, गौरवने पोस्टद्वारे सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. “एक कलाकार म्हणून अजून काय पाहिजे….? मला फार बोलता येत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलंत, करताय त्याचं ऋण कसं फेडावं…? हे काही मला सूचत नाहीये…फ़क़्त एवढच बोलू शकतो…मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद दुबई…love you”, असं गौरवने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive