राखी सावंत म्हणजे एंटरटेन्मेन्ट एंटरटेन्मेन्ट आणि एंटरटेन्मेट. यंदा बिग बॉस मराठी सीझन 4 चं घर राखीने गाजवलं. चॅलेंजर्स म्हणून घरात आलेल्या राKrने आपल्या कारनाम्यांनी घर तर दणाणून टाकलंच पण त्याचबरोबर सदस्यांच्या नाकेनऊ आणले. आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलेली राखी आदिलशी निकाह केल्यामुळे बरीच चर्चेैत आहे. तसं तर लाईमलाईटमध्ये राहण्याचा राखीचा नेहमीच अट्टाहास असतो, त्यासाठी ती कुठलीही पातळी गाठायला नेहमीच तयार असते. आता आदिलने त्यांचं लग्न झालं असल्याचं कबुल केलं. अशातच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता यावर राखीने प्रतिक्रिया दिली आहे.
मे २०२२ मध्ये राखीने आदिलशी लग्नगाठ बांधली. आतापर्यंत ती विवाहबद्ध झाली आहे हे तिने गुलदस्त्यात ठेवलं होतं. पण अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांचं लग्नाचं गुपित उघड झालं. दरम्यान राखी गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामळे सर्वांना पुन्हा धक्का बसलाय.
विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीच्या मुलाखतीचा एक कोट प्रसिध्द करण्यात आला आहे. राखी म्हणते, " हो मी गरोदर होती. बिग बॉस मराठीमध्येसुध्दा मी हे बोलले होते, पण सर्वांनी ते हसण्यावारी नेलं आणि कोणीच ते गंभीरपणे घेतलं नाही. "