By  
on  

स्वप्निल जोशीचं मराठीत ट्वीट, नेटक-यांनी घेतली शाळा

मराठी सिनेसृष्टीत सध्या उत्साहाचं वातावरण आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत तर वाळवी या रहास्यमय सिनेमालासुध्दा प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच कलाकार आणि प्रेक्षकवर्गात आनंद ओसंडून वाहतोय. याचाच आनंद म्हणून मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय आणि सुपरस्टार स्वप्निल जोशीने एक ट्विट केलं. पण ते ट्विट त्याला चांगलंच महागात पडलंय. कारण या ट्विटवरुन नेटक-यांनी त्याची चांगलीच शाळा घेतलीय. 

“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन. रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!, असे ट्वीट स्वप्निल जोशीने केले आहे. मात्र त्याच्या या ट्वीटमध्ये त्याने मराठीतील काही शब्द चुकवल्याने तो ट्रोल झाला आहे.

 

 

स्वप्निल जोशीने या ट्वीटवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका.” तर एकाने आधी “मराठी व्यवस्थित लिहा, असा सल्ला दिला आहे. त्याबरोबर त्याने पाढते? वैनी? पाउल?” असे शब्द लिहिले आहेत.

 

 

 

तर एकजण म्हणाला, “वैनी नाही रे वहिनी.” तर एकाने “अरे कसली भाषा तुमची.. वहिनी असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..”, असे कमेंट केली आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive