तिलाही ह्यातलं सुख कळलंय...: आई फेम अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर

By  
on  

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतेय. तसंच टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल आहे, या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.

मालिकेची नायिका अरुंधती मालिकेतून छोटा ब्रेक घेऊन तिच्या आवडीच्या गोष्टी करण्याला प्राधान्य देतेय. 

मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मधुराणीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या लेकीनेच कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओ ती एका झोपाळ्यावर झोके घेताना दिसत आहे. यावेळी तिचा आनंद गगनात मावत नाहीय. म्हणूनच तिने यासाठी छानसं कॅप्शनही लिहलंय. 

अरुंधती म्हणते, झोका...झोपाळा, झुला लहानपणापासून मला वेड आहे ह्याचं.

उंच उंच झोके घ्यायला मला प्रचंड मजा येते. झोक्यावर मी अक्षरशः मला विसरते.

आणि तेच वेड माझ्या लेकीमध्ये पण आलंय. आपला जीव दडपावा इतके उंच झोके ती घेते. हा व्हिडीओ पण तिनीच काढलाय

तिलाही ह्यातलं सुख कळलंय..... ह्याचं मला सुख आहे.

Recommended

Loading...
Share