मालिका संपताच साध्याभोळ्या नेहाचा ग्लॅमरस अवतार आला समोर, पाहा Video

By  
on  

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहा कामत या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं. परीची आई म्हणून तिला खुप पसंती मिळाली.  मालिकेने नुकताच निरोप घेतला. पण प्रार्थना मात्र चाहत्यांच्या भेटीस सतत येत असते. 

ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते. विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. बरेचदा ते ग्लॅमरस असतात. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. साजेसा मेकअप व केस मोकळे सोडून प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच कलाकारांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

क्रॉप टॉप आणि स्कर्टमधला नेहाचा हा पूलजवळचा बोल्ड अंदाज चाहत्यांना क्लिन बोल्ड करतोय. 

 

प्रार्थनाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना भावतायत.  या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. आता तिच्या नेक्स्ट प्रोजेक्टची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share