मराठीतील पहिली 'हॉरर अंगाई', गायिका जुईली जोगळेकरने शेयर केला व्हिडीओ

By  
on  

आपण अंगाई तर लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आई-मावशी-आजी या सगळ्यांच्या आवाजात अंगाई ऐकून आपण शांत झोपायचो. पण हॉरर अंगाई असते असं कधी ऐकलंय का ...तर नाही.....नवल वाटतं ना...पण प्रसिध्द गायिका जुईली जोगळेकर हॉरर अंगाई घेऊन चाहत्यांच्या भेटीस आलीय...ते पण तिच्या अंगावर शहारा येईल अशा आवाजात. पाण्याखालचं जग दाखवणारा 'गडद अंधार'हा थरारक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच मराठीत असा आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या थरारक टीझर आणि ट्रेलरने सर्वांचीच धडकी भरवली होती. त्यांनतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक नवा प्रयोग केला जात आहे. आणि तो प्रयोग म्हणजे पहिल्यांदाच मराठीत 'हॉरर अंगाई'सादर करण्यात येत आहे

गायिका जुईली जोगळेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. जुईलीने पोस्ट शेअर करत लिहलंय, 'सादर करत आहोत, मराठी सिनेमाच्या इतिहासातली पहिली Horror ‘अंगाई’.. !. ही अंगाई जुईली जोगळेकरने गायली आहे. जुईलीचा आवाज अंगावर शहारा आणत आहे. 

 

Recommended

Loading...
Share