संजय जाधव सोबतच्या नात्यावर तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

By  
on  

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनया सोबतच तेजस्विनी आता एक य़शस्वी निर्माती म्हणून ओळखली जाते. तेजस्विनीची पहिली निर्मिती असलेली अथांग ही वेबसिरीजही अलिकडेच प्रदर्शित झाली. तर तिचा पहिलाच निर्मिती असलेला सिनेमा नुकताच 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रीबद्दल सध्या वेगळीच चर्चा सुरु आहे.

 

 दिग्दर्शक संजय जाधव याच्यासोबत तेजस्विनीचं अफेअर असल्याचं म्हटलं गेलं. संजय आणि तेजस्विनी यांनी अनेक चित्रपट सोबत केले. संजयच्या प्रत्येक चित्रपटात तेजस्विनी असतेच असं म्हणत ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत असं पसरवलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीने यावर रोखठोक भाष्य केलं आहे. 

 

 

तेजस्विनी म्हणाली, 'माझं आणि संजय जाधव याचं अफेअर आहे ही माझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात वाईट अफवा होती. माझ्यासाठी ही गोष्ट अनपेक्षित होती. संजय दादा आणि माझं अफेअर आहे हे ऐकणं माझ्यासाठी वाईट होतं. कारण मी त्याला दादा म्हणते. तो माझा दादा आहे. आम्ही दोघेही खूप घट्ट आहोत. आमच्यातलं नातं खूप घट्ट आहे. दादा मला त्याच्या मुलीसारखी वागणूक देतो. तो माझ्यात आणि त्याची मुलीमध्ये मुळीच फरक करत नाही. तो मला त्याच्या मुलीप्रमाणे वागणूक देतो. त्यामुळे आमच्या नात्याबद्दल पसरलेली ही अफवा खरंच वाईट होती.'

 

दरम्यान, तेजस्विनी आणि संजय जाधव यांनी अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं. 

Recommended

Loading...
Share