Video : आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By  
on  

राखी सावंतला मातृशोक झाला. राखीच्या आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. राखी सावंतने स्वतः या वृत्ताची माहिती दिली . मागील महिन्यात बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्याने राखी सावंत चर्चेत होती. राखी बिग बॉसमध्ये अनेकदा आाजरी आईचा उल्लेख करताना दिसली आहे.  आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. तिचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आईचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर नेत असताना राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली. रुग्णालयातील राखीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात ती जोरजोरात अक्रोश करताना दिसत आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव घेऊन बाहेर निघत असताना दिसत आहे.

 

Recommended

Loading...
Share