विशाखा सुभेदार कोणाला म्हणाल्या, 'गरज सरो वैद्य मरो ?'

By  
on  

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. पण काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीने महाराष्ट्राची हास्यजत्रेचा निरोप घेतला. त्यानंतर विशाखा या नाटकांमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या स्टार प्रवाहवर त्यांची शुभविवाह ही मालिका प्रदर्शित होत आहे. तसंच ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुंळे सुध्दा त्या चर्चेत आहेत. 

विशाखा सुभेदार यांनी  इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये ती ‘जरुरत थे हम या जरूरी है तुमको’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी खुपच लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 

 

विशाखा सुभेदारची पोस्ट

“जरुरत, गरज …किती खरी किती खोटी? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच की आपल्याला उशिरा का होईना..गरज सरो वैद्य मरो अशाच्या समवेत फार काळ राहू नये आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.”

 

 

आता हा इशारा नेमका कोणासाठी आहे. ह्याचा नेटकरी अंदाज लावत आहेत. विशाखा सुभेदार यांची ही पोस्ट सध्या भलतीच चर्चेत आहे.  

Recommended

Loading...
Share