By  
on  

मेहंदी है रचनेवाली..! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची लगीनघाई

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज् पोस्ट करत होती. वनिता प्रियकर  सुमीत लोंढेसह विवाहबंधनात अडकणार आहे

.वनिता व सुमीतच्या घरी लगीनघाई सुरू आहे. वनिता व सुमीतच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच वनिताचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनिताच्या मेहेंदी सोहळ्यात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवाली परब, चेतना भट्ट यांनी वनिताच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

येत्या 2 फेब्रुवारीला वनिताचा विवाह संपन्न होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिताने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive