“नवीन दाजी का?” घटस्फोटादरम्यान ‘त्या’ व्यक्तीबरोबर व्हिडीओ शेअर करताच मानसी नाईकला नेटक-यांनी विचारला प्रश्न

By  
on  

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक व पती प्रदीप खरेरा यांच्यात काहीच आलबेल नाही. त्यांचा आता लवकरच घटस्फोट होणार आहे . मागच्या वर्षीच मानसी लग्नबंधनात अडकली होती. पती परदीप खरेरा यांच्यासोबतचे अनेक रोमॅण्टिक व्हिडीओ आणि फोटोसुध्दा ती सतत चाहत्यांसोबत शेयर करायची. पण गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ-फोटो शेयर करणं सोडाच उलट तिने आपल्या लग्नाचे आणि पतीसोबतचे सगळे फोटो-व्हिडीओ काढून टाकले आाहेत. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रीया सध्या सुरु आहे. दोघांचही सोशल मिडीयावर बरंच युध्द पाहायला मिळालं. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. 

दरम्यान सोशल मीडियावर मानसी विविध पोस्ट करताना दिसत आहे. त्यातच आता मानसी नाईकने पुन्हा एक पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.ही पोस्ट तिच्या नवीन व्हिडीओ गाण्याबाबत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गायक स्वरुप भालवणकरसह दिसत आहे. मानसीने स्वरुपच्या खांद्यावर हात टाकत व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मानसीला नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला आहे.

नवीन दाजी का? असा प्रश्न मानसीला नेटकऱ्यांनी विचारला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून प्रदीप खरेराला वाईट वाटणार असंही काहींनी म्हटलं आहे. मानसी ‘दिल तुटा है तो क्या’ या गाण्यामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share