By  
on  

शूटींगमधून पॅकअप झाल्यावर अश्विनी भावे यांनी 'अशी केली शॉपिंगची धम्माल

अभिनेत्री अश्विनी भावे अमेरिकेतूनही फॅन्सशी सोशल मिडीयातून कनेक्टेड असतात. सध्या त्या  'घरत गणपती' या सिनेमाच्या शूटिंगसाठी भारतात आल्या आहेत. शूटिंगच्या सेटवरुन त्यांचे वेगवेगळे व्हिडीओ - फोटोज सोशल मिडीयावर पोस्ट होत आहे.

अलिकडेच त्यांनी कोचीच्या मार्केटमध्ये शॉपिंग करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी कोचीमध्ये सिनेमाचं शूटिगं सुरू होतं, त्यावेळी लवकर पॅकअप झाल्यावर अश्विनी भावे आपल्या सहकलाकारांसोबत शॉपिंगला गेल्या होत्या , त्यावेळीचा हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. शूटिंगमधून लवकर पॅकअप झाल्यावर शॉपिंग तो बनता है, असं कॅप्शन दिलं आहे. 

अश्विनी भावे या सध्या सोशल मिडीयावर एक्टीव्हही आहेत. नुकतेच त्यांनी इन्स्टाग्रामवर 1 लाख (100 k) फॉलोअर्स पूर्ण झाले. 
अमेरिकेतून त्या ग्रीन डोअर उपक्रमाबद्दलचे व्हिडीओ पोस्ट करतात, त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक व्हिडीओ हे फॅन्‌सना पसंत पडत असतात.

Recommended

PeepingMoon Exclusive