आमदार बाईंपेक्षा एकदम कडक भूमिकेत दिसणार बिग बॉस फेम तेजस्विनी लोणारी

By  
on  

बिग बॉस मराठी ४ मुळे प्रसिद्दीच्या शिखरावर पोहचलेली सर्वांची लाडकी तेजू म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस २ या सर्वात लोकप्रिय मालिकेत आमदार बाई ही राजकीय डावपेच आखणारी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर तेजस्विनीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gina (@the_gg_styles)

उत्तम टास्क खेळून आणि योग्य रणनिती आखून तेजस्विनी बिग बॉसच्या घरातले अनेक टप्पे पार करत होती. परंतु खेळाच्या उत्तरार्धात मात्र टास्कदरम्यान तिच्या हाताला दुखापत झाली व तिला  घराबाहेर जावे लागले. तेजस्विनी ही प्रेक्षकांची खुप लाडकी स्पर्धक होती. सर्वांनी तिला पब्लिक विनर म्हणूनच घोषित केले. तिच जिंकेल अशी सर्वांना आशा होती, परंतु हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला खेळ सोडावा लागला होता.

तेजस्विनी आता बरी असून तिचा हातही बरा आहे. तेव्हा तिने पुन्हा वर्क मोड ऑन केलं आहे. 'थ्री चिअर्स' नावाच्या नव्या सिनेमाच्या शुटींगला तेजस्विनीनं सुरूवात केली आहे. क्लॅपबोर्ड हातात असलेला फोटो शेअर करत तेजस्विनीनं ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

प्रेक्षकांना आता तिच्या या आगामी सिनेमाची  उत्सुकता लागली असून ते तिच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

Recommended

Loading...
Share