हळद लागली हळद लागली! वनिता-सुमितवर चढला हळदीचा रंग

By  
on  

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज् पोस्ट करत होती. वनिता प्रियकर  सुमीत लोंढेसह विवाहबंधनात अडकणार आहे

शानदार मेहंदी समारंभानंतर नुकतीच वनिता आणि सुमितची हळद रंगली. 

वनिता खरात आज लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या हळदीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे.

हास्यजत्रेतल्या कलाकारांनी वनिताच्या हळदीला एकच कल्ला केला. वनिता आणि सुमित आज २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Recommended

Loading...
Share