‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात

By  
on  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात प्रियकर सुमित लोंढे सोबत विवाहबंधनात अडकली आहे. गेले अनेक दिवस सोशल मिडीयावर वनिताच्या लग्नसोहळ्याची विविध विधींची धूम सोशल मिडीयावर पाहायला मिळत होती. २ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. 

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली होती. पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य खुलून आलं होतं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता. 

 

 

वनिता व सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कलाकारांनी हजेरी लावत ह्या सोहळ्याला चार चॉंद लावले. वनिताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे मेहेंदी व हळदी, संगीत सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले.

चाहते वनितावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

Recommended

Loading...
Share