गोदावरी, वेड या सिनेमांचा प्रसिध्द संवाद लेखक प्राजक्त देशमुखचं नेहमीच कौतुक झालं. वेड सिनेमाची जादू अजूनही बॉक्स ऑफीसवरुन उतरलेली नाही. सैराटनंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा म्हणून वेडचं नाव आहे. अशातच आता वेडचा संवाद लेखक प्राजक्त देशमुखच्या गाडीचा अपघात झाला आणि तो त्यातून थोडक्यात बचावला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्राजक्तनेच ही माहिती सर्वांना दिली. मुंबई-नाशिक हायवेवर प्रवास करताना प्राजक्तच्या गाडीला अपघात झाला.
प्राजक्त ट्वीट करत म्हणाला, “नाशिक मुंबई हायवेवरुन धावणारी अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला.”
“थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लावून दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम” असं म्हणत प्राजक्तने त्याचा संताप व्यक्त केला आहे. पुढे तो म्हणाला, “ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.”
नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?१/ज्ञ pic.twitter.com/uaJSasmXey
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023
“अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असताना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक-मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा.”
https://t.co/D7pcNwrN8r
ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा. ज्ञ/ज्ञ— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023