By  
on  

गिरीश कुलकर्णींच्या 'थंकम' या मल्याळम सिनेमाबद्दल तुम्हाला माहितीय का?

आशयघन मराठी सिनेमांसाठी  अभिनेते पटकथाकार आणि संवाद लेखक गिरीश कुलकर्णी प्रसिध्द आहेत. त्यांचे वळू, देऊल, मसाला, पुणे ५२, विहीर, जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमांचे आपण सगळेच चाहते आहोत. प्रत्येक सिनेमांमधून भूमिकेमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गिरीश यांना गौरविण्यात आलंय. आता हेच गिरीश कुलकर्णी मल्याळम सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवतायत. 

गिरीश कुलकर्णीनं मल्याळी सिनेमात पदार्पण केलंय. 'थंकम' या मल्याळी चित्रपटाच्या निमित्तानं ते तिथे नावाजले जात आहेत. 'थंकम'मध्ये त्यांनी तमिळनाडूत एका केसच्या चौकशीसाठी आलेल्या मराठी पोलिसाची भूमिका साकारली आहे.

 

मल्याळी येत नसलेल्या एका तडफदार पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा त्यानं उत्तम वठवली आहे. ही भूमिका गिरीशनंच साकारावी असं चित्रपटाच्या संपूर्ण टीमला वाटत होतं. चित्रपटाचा पटकथा लेखक श्याम पुष्करणने याआधीही गिरीशबरोबर काम केलं आहे. श्यामने त्याला फोन करून त्याची इच्छा सांगितली. चित्रपटाची कथा ऐकताच गिरीशनेही लगेच होकार कळवला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive