केतकी माटेगावकर -प्रसाद ओक घेऊन येतायत 'मीरा'ला

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. एकापेक्षा एक भन्नाट रील्स अपलोड करत प्रसाद नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. पण नुकतंच प्रसादनं केलेल्या एका पोस्टने नेटक-यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसाद ओक आणि अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर ही जोडी आगामी मीरा सिनेमाच्यानिमित्ताने एकत्र झळकणार आगहे. दोघांनी या सिनेमाबाबत पोस्ट करताना मीरा आणि पुढे प्रश्नचिन्ह कॅप्शनमध्ये दिलं आहे. 

केतकी माटेगावकरने गाणं आणि अभिनय अशा दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाळा, काकस्पर्श, तानी, फुंतरु या सिनेमामुळे केतकीचं खुप कौतुक झालं. तर रवी जाधव यांच्या टाईमपास या सुपरहिट सिनेमामुळे केतकी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. केतकीची जादू आजही कायम आहे. तिने सिनेमातून अनेक वर्ष मोठा ब्रेक घेतला होता. पण आता ती पुन्हा कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमाबाब खुप उत्सुकता लागून राहिली आहे. 

अभिनेता प्रसाद ओक आणि केतकी माटेगावकर ही वयात बरंच अंतर असलेली जोडी पाहून प्रेक्षक मीरा सिनेमाच्या कथानकाविषयी अनेक तर्कवितर्क लावत आहेत. 

Recommended

Loading...
Share