Bigg Boss 16 Finale पू्र्वीच शिव ठाकरेचं नशीब उजळलं, हाती आला सलमान खानचा सिनेमा?

By  
on  

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचलेला आपला मराठमोळा शिव ठाकरे हा या सीझनच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. या शोमध्ये त्याने भल्याभल्यांना कॉंटे की टक्कर दिली. या सीझनमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. आता ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले असताना शिवच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मिडीया रिपोर्टनुसार, बिग बॉस हिंदी सीझन 16 चा विजेता जाहीर होण्यापूर्वीच शिवच्या हाती भाईजान सलमान खानचा आगामी सिनेमा आल्याचे बोलले जात आहे. या सिनेमात शिवची खास भूमिका असणार आहे. पण सिनेमाबाबत अधिक माहिती अद्याप कळू शकलेली नाही. सलमानच्या सिनेमात शिवची वर्णी होणार हे ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमातून अनेक कलाकार बॉलिवूड डेब्यू करणार आहेत. तसंत 2023 मध्ये या सिनेमाव्यतिरिक्त दबंग खानचा टाईगर ३ पण प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे शिव या सिनेमांपैकी कोणत्या सिनेमात पाहायला मिळणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

 

Recommended

Loading...
Share