By  
on  

“आमचं पहिलं बाळ…” अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची नवीन इनिंग

मन उधाण वा-याचे या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आता नव्या इनिंगला सरुवात करतेय. आत्तापर्यंत तिने अनेक विविध मालिकांमधून आणि शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या नव्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

आतापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शर्मिष्ठा आता निर्माती म्हणून प्रेक्षकां समोर येणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं या मालिकेचं नाव असून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषी शेलार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत शर्मिष्ठाने लिहिलं, “आमचं पहिलं बाळ…” तुला शिकवीन चांगलाच धडा”… आत्तापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रवास सुरुच आहे त्याच बरोबर निर्माती म्हणून नवीन प्रवास मी आणि तेजसने सुरु केला आणि त्यात मोलाची साथ आम्हाला दिली आमच्यावर विश्वास ठेवला झी मराठी आणि मधुगंधा कुलकर्णी ह्यांनी.. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून तुम्ही रासिक प्रेक्षकांनी कायम मला साथ दिली…आता या पुढच्या नवीन प्रवासासाठी तुमचे आशिर्वाद कायम आमच्या सोबत असू दे…”

 

शर्मिष्ठाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  

Recommended

PeepingMoon Exclusive