वैदेही परशुरामी आणि 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेबद्दल समोर आली ही माहिती

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री  वैदेही परशुरामी 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेला डेट करतेय अशा चर्चा रंगल्या होत्या. यशराज मुखाटे सोबत वैदहीचं नाव जोडलं गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

 

 

यशराज मुखाटेला सोशल मीडियावर 'तुझी आवडती अभिनेत्री कोण?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव घेतलं

 

 

आता याबद्दलच वैदेहीने खुलासा केला आहे. तिने यावेळी दोघांच्या नात्याविषयी अपडेट दिली आहे.

 तिला यशराजबद्दल प्रश्न विचारल्यावर ती असं म्हणाली, 'मी एकदाच त्याला एक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटली आहे.

ती पुढे म्हणाली, 'आमच्यात फक्त एक संवाद झाला होता तो म्हणजे कामाबद्दल मी त्याला सांगितले की मला तुझे काम आवडते. माझं नाव यशराज मुखातेबरोबर लिंक झाल्याने मला आनंद झाला आहे. मी त्याच्या प्रेमात नाही मी त्याला ओळखत ही नाही.' असा खुलासा तिने केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

वैदही लवकरच जग्गू आणि ज्युलिएट या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय, झोंबिवली या सिनेमानंतर अभिनेता अमेय वाघ सोबत ती पुन्हा एकदा झळकणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share