ज्या कॅडबरी कंपनीत बाबांनी कष्ट केले त्याच कंपनीच्या...प्राजक्ताची भावूक पोस्ट

By  
on  

मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळी देशाच्या कानाकोप-यात पोहचलीय. सोशल मिडीयावरुन एकापेक्षा एक जबरदस्त कॉन्टेट निर्माण करुन नेटक-यांची मनं जिंकणारी प्राजक्ता आज एक प्रसिध्द अभिनेत्रीसुध्दा आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अभिनय, जाहिरात, वेबसिरीज अशा सर्वच ठिकाणी प्राजक्ता झळकते. वेब क्विन म्हणून ती लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्येसुध्दा तिने आता तिचं स्थान निर्माण केलंय. तिचा हा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा आहे. नुकतंच एक पोस्ट शेयर करत, प्राजक्ताने चाहत्यांचं आणि नेटक-यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट लिहताना ती खुपच भावूक झाल्याचं दिसतंय. प्राजक्ताचे बाबा ज्या कॅडबरी कंपनीच्या कॅंटीन विभागात काम करायचे आज त्याच कॅडबरी कंपनीच्या जाहिरातीच्या होर्डींग्जवर प्राजक्ता दिमाखात झळकलीय. यामुळेच ती खुप भावूक झालीय. आई बाबांचेसुध्दा तिने या होर्डिंग्जवळ छान फोटो काढले आहेत. 

प्राजक्ता म्हणाली, मी जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा बाबा कॅडबरी कंपनीत डबल शिफ्टमध्ये काम करत होते. प्राजक्ताने बाबंना शांत बसलेलं कधीच पाहिलं नाही. ते म्हणाले, बाळ मला लोकांना खाऊ घालायचंय, बसून चालणार नाही. 

प्राजक्ता पुढे लिहते, "मला योग्य शिक्षण, पोषण, शिष्टाचार आणि महत्त्वाकांक्षा देण्यासाठी माझे पालक दररोज काम करताना मी पाहिले. अनेक-अनेक विचित्र नोकऱ्या केल्या. पण बाबांचा कॅडबरीतील कार्यकाळ नेहमीच खास होता. प्रत्येक दिवाळीला बोनससह घरी येणारा तो चॉकलेट ट्रे नेहमीच खास असायचा आणि आमच्या चेह-यावरचा अविस्मरणीय आनंद. हे माझ्यासाठी खूप खास आणि अस्विमरणीय होते. या जीवनाबद्दल आणि ते देत असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ असेल. तुमच्यासाठी कृतज्ञासाठी आभारी", असे प्राजक्ता म्हणाली."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

 

प्राजक्ताच्या या पोस्टवर बॉलिवूड कलाकारांसह मराठमोळ्या कलाकारांनी गोड शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केलं आहे.   या पोस्टवर अनुष्का शर्मा, सुनिल शेट्टी, नेहा कक्कर, अनन्या पांडे, अमृता खानविलकर, प्रिया बापट, शर्मिष्ठा राऊत, तितिक्षा तावडे आदी कलाकारांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share