महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशातही असंख्य चाहते आहेत. सर्वांनाच हा कार्यक्रम पोटभर हसवतो आणि टेंशन विसरायला भाग पाडतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात नुकतीच विवाह बंधनात अडकली. २ फेब्रुवारी रोजी तिने प्रियकर सुमित लोंढेशी लग्न केलं. त्यांचं लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं. या लग्नसोहळ्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातले सर्व कलाकार आवर्जून हजर होते. सर्वांनी ह्या लग्नात एकच धम्माल केली. पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रेतले हास्यरसिक म्हणजेच परिक्षक सई ताम्हणकर व प्रसाद ओक यांच्या सोबतच सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांना जाहीर माफी मागावी लागली.
कारण या तिघांनी जी चुकी केलीय त्या चुकीला माफी नाहीय...त्यामुळे त्यांना हा जाहीर माफीनामा द्यावा लागलाय. प्रसाद ओकने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्याच्याबरोबर सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके आणि सई ताम्हणकर दिसत आहेत. यात हे तिघही सर्वांची हात जोडून माफी मागत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळं मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके जाहीर माफी मागत आहोत.” आता प्रसादची ही स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. तर ही गमतीशीर स्टोरी रिपोस्ट करत वनिताने देखील त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही स्टोरी रिपोस्ट करत तिने लिहिलं, “गिफ्ट दिल्याशिवाय माफी मिळणार नाही.”