By  
on  

प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता- दिग्दर्शक  प्रसाद ओक हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. धम्माल रील्स शेयर करत तो नेटक-यांची मनं जिंकतो. प्रसाद ओक अभिनीत धर्मवीर या सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं. ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवरही जादू केली. प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. त्याच्या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. नुकतंच प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओक सोशल मीडियावर कायमच अपडेट देत असतो. त्याने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!” अशा शब्दात त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive