By  
on  

जाळ अन् धूर संगटच ! किरण माने करणार महेश मांजरेकरांसोबत काम

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर ते नेहमीच चर्चेत असतात. तसंच यंदा बिग बॉस मराठी ४ चं घर गाजवण्यात ते अग्रस्थानी होते. बिग बॉस मराठीच्या टॉप 3 स्पर्धकांमध्ये किरण मानेंनी स्थान मिळवलं. 

बिग बॉसच्या घरात असताना त्यांना मास्टरमाईंड म्हणून संबोधलं जायचं. ट्रॉफी हुकली असली तरी प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रचंड लोकप्रियता मानेंनी मिळवली. 

 

किरण मानेंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा हाती बिग बॉस महेश मांजरेकरांचा  सिनेमा आला आहे. त्यामुळे ते खुपच उत्साहित  आहेत आणि त्यांनी महेश मांजरेकरांसोबतचा फोटो पोस्ट करत एक खास मेसेज लिहलाय,  ''वास्तव' हे हाय की, आता 'कॅमेरा' माझी आन् मी कॅमेर्‍याची पाठ सोडत नसतोय. मी येतोय भावांनो... लवकरच... एका नादखुळा भुमिकेत... वुईथ 'द महेश मांजरेकर' ! अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए.. मौसम बिगड़ने वाला है...

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive